जागतिकीकरण
जागतिकीकरणाची:
जागतिकीकरण ही संकल्पना अतिशय व्यापक आहे. त्याला इंग्रजीमध्ये Globalization असे म्हटले जाते. जागतिकीकरणाचा अर्थ म्हणजे जगातील राष्ट्रांनी मुक्त अर्थ व्यवस्थेचा स्विकार करणे एवढाच नसून व्यापार, वित्त, रोजगार, कृषि तंत्रज्ञान, विदेशी स्थलांतर दळणवळण, पर्यावरण, राहणीमान, फॅशन, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रामध्ये झालेला बदल आहे. याशिवाय या जागतिकीकरणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, व खाजगीकरणास मुक्त अवसर, गुंतवणूकिस मुक्त मान्यता, संगणक आणि वाहतूकिस सार्वत्रिक मान्यता, औद्योगिक उत्पादनाच्या निर्यातीस मुक्त संचार आणि गॅट कराराच्या आधारे शेती, धान्य, कर सवलती, औषध निर्मीती आयात - निर्यात याविषयी प्रत्येक देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य या सर्व प्रमुख घटकांच्या एकात्म धारणेला जागतिकीकरण असे म्हटले जाते.
१.जागतिकीकरणाचे जग म्हणजे असे की, त्यामध्ये राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटक बहुव्यापकपणे परस्परांशी जोडलेले असतात.
२.जागतिकीकरण ही अर्थशास्त्र संकल्पना असून त्यामध्ये विभिन्न देशात परकिय मालाच्या विक्रीस कोणतेही बंधने असू नयेत,असा विचार केला जातो.
३.जागतिकीकरण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. तिच्या अंतर्गत सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेवर असणारे भौगोलिक प्रभाव दूर होतात आणि भौगोलिक सीमा अनावश्यक आहेत याची जाणीव लोकांना होते.
४.जागतिकीकरण म्हणजे सरकारी हस्तक्षेप अथवा नियंत्रण तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने कमी करुन खाजगी क्षेत्रास अधिकाधिक वाव देणे म्हणजे जागतिकीकरण होय.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा