स्वप्न
काळजात पेटलेले निखारे
आसवांनी विझवितांना
अंधाराचा एक एक घोट पिऊन
मी कवटाळून घेतो झोपेला
आसवात भिजलेली रात्र
मी पांघरुन घेतो विनातक्रार
पहाटेच्या स्वप्नांसाठी
झुंजुमंजू होताना
अमेरिकेचे माझ्या गालावरुन ओघळणाऱ्या अणूंची
दंवबिंदू झालेली.....
लतावेली पाना-पानानी झेलून घेतलेली
रविकिरणांच्या पहिल्या स्पर्शानं
दवबिंदूंची फुलं होताना
मला जाग येते
तेव्हा-
दारावरचा पारिजात बहरुन आलेला
चांदण्या फुलांचा अंगणात सडा पडलेला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा