● प्रास्ताविक -
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांना अद्वितीय बुध्दीमत्ता लाभलेली होती. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासह राजकिय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये वेळोवेळी जे विचार मांडले होते ते विचार त्या काळापूरतेच मर्यादित नव्हते, तर भविष्याचा वेध घेण्याची ताकद त्या विचारात होती. ते उच्च विद्या विभूषित होते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतांनाही त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले होते. अमेरिकेत जाऊन त्यांनी एम.ए. व पीएच.डी ची पदवी संपादन केली. इंग्लडमध्ये बॅरिस्टरची परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. तसेेच डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांनी मिळविली होती. अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक, विधी महाविद्यालयात प्राचार्यपदी त्यांनी कामकाज केले आहे. भारतीय राज्यघटनेचा मसूदा समीतीचे सदस्य म्हणून राज्यघटना निर्मितीमध्ये त्यांचे अतिशय मौलिक योगदान आहे.
बालपणीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेचा कटू अनूभव घेतला होता. त्यामूळे सामाजिक समता निर्माण करणे, दलित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, त्यांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे व त्यांचा उत्कर्ष साधणे यासाठी ते नेहमी प्रयत्नशिल होते. मानवाच्या विकासातील शिक्षणाचे महत्व लक्षात आल्यामूळेच शिक्षण संघटन व संघर्ष यांच्या माध्यमातून हजारो वर्ष गुलामगिरीच्या खाईत लोटलेल्या लाखो दीन, दलित पिडीतांच्या पुनरुत्थानचे महान कार्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
● डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार व कार्य - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जन सामान्यांसाठी तसेच वंचितांसाठी होते. समाजाचे शिक्षणाद्वारे उत्थान व्हावे असे त्यांना वाटे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तीन मानव कल्याणाच्या तत्वास अनुसरून जीवन व्यथित करणारा समाज डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणातून निर्माण व्हावा हे अभिप्रेत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणास अतिशय महत्व दिले आहे. परंतु विध्देेसोबत चार पादमिता असाव्यात असे त्यांना वाटते. त्यांच्याच शब्दात सांगावयाचे म्हणजे माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरण युक्त, असं चंदण, करूणा म्हणजे सर्व, मानव जाती संबंध प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे आत्मीयता विध्देेबरोबर या चार पारमियता असल्या पाहिजेत.
शिका संघटीत व्हा व लढा हा संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना दिला होता. ते स्वत: उच्च विद्याविभूषित होते. त्यांच्याकडे भारतातील व इंग्लड, अमेरीका विद्यापीठांच्या उच्च पदव्या होत्या. मुंबईतील सिडने हॅम महाविद्यालयात ते काही दिवस प्राध्यापक होते. 1928 मध्ये त्यांनी All India Depressed class Education ची स्थापना केली व या सोसायटीच्या वतीने अस्पृश्य समाजातील मुलांसाठी दोन वसतीगृह स्थापन करण्यात आली. तसेच त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ञ व शासनाला साध्या सोप्या भाषेत पण स्पष्टपणे देशहित समोर ठेवून शिक्षण विषयक विचार मांडलेत.
● शिक्षणाचे महत्व - शिक्षण हा मानवी विकासाचा केंद्रबिंदू आहे. ज्ञान हि मानवी आयुष्यातील पायाभूत गोष्ट आहे. माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. शिक्षण घेणे हे एक मोठे आत्मोध्दाराचे व समाजाच्या प्रगतीचे एक मोठे साधन आहे. शिक्षणा अभावी व्यक्ती दुसज्याचा गुलाम बनते. प्रत्येक व्यक्तिला त्याची जन्मजात प्रतिष्ठा जपण्यासाठी तसेच त्याचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शिक्षण मिळणे आवश्यक आहे. किंबहूना तो व्यक्तिचा हक्कच आहे. अस्पृश्य वर्गात शिकणाचा प्रसार झाल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही. तसेेच आधुनिक शिक्षणामुळे नागरिकांना त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव होईल. व्यक्तीमध्ये स्वातंत्र्य रक्षणाची शक्ती शिक्षणामुळे उत्पन्न होईल. अशाप्रकारे शिक्षणाचे महत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले होते.
● राज्य व शिक्षण - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशातील निरक्षरता व शैक्षणिक मागासलेपणाची पूर्ण जाणीव होती. शिक्षण ही समाजाची अत्यंत महत्वाची गरज आहे. सामाजिक प्रगतीचे ते एक मोठे साधन आहे. हे ही ते जाणत होते. शिक्षण हा व्यक्तिच्या प्रगतीचा व सामाजिक विकासाचा पाया आहे. शैक्षणिक प्रगती, शैक्षणिक विकास यांचा जवळचा संबंध आहे हे ते ओळखून होते म्हणून राज्याने दलितांच्या शैक्षणिक उध्दारासाठी लक्ष पुरविले पाहिजे अशी त्यांची मागणी होती. त्यांच्यामते शैक्षणिक सुविधा पुरविण्याची जास्तीत जास्त जबाबदारी राज्यावर आहे. तसेच पुरविण्यात येणाज्या शैक्षणिक सुविधांचा जास्तीत जास्त फायदा समाजातील सर्व वर्गांना मिळता की नाही हे देखिल शासनाने पाहिले पाहिजे. वास्तव शैक्षणिक कार्यात शासकिय प्रयत्नांचे स्वागतही त्यांनी केलेले दिसून येते.
● स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्त्री शिक्षणावर भर दिला त्यांच्या मते स्त्रियांना शिक्षण मिळाल्यास कुटूंबाचा खरा विकास होईल. जीवनमान सुधारण्यासाठी चांगले संस्कार करुन कुटूंबाला नैतिक वळण लावण्यासाठी स्त्रियांना शिक्षण देणे आवश्यक आहे.
हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी हिंदू स्त्रियांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मतभेद झाल्यामुळे त्यांनी हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावर केंद्रिय मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. नंतर त्यांच्याच विचारावर आधारित काही कायदे भारतीय शासनाला करावे लागले. हे सर्व कायदे हिंदू कोड बिलावर आधारित होते. बाल विवाहास विरोध, विधवा पुर्नविवाहास आणि आंतरजातीय विवाहास उत्तेजन ही त्यांच्या विचारांची विविध रूपे होती.
● स्त्री पुरूष समानता - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री पुरूष समानता असावी अशी आग्रही भूमिका होती. ही समानता होण्यासाठी स्त्री शिक्षणाचा मार्ग त्यांनी सांगीतला. स्त्रियांना समाजात व कुटूंबात उत्त्तम वागणूक व समान दर्जा मिळाला पाहिजे. स्त्री शिक्षणाने कुटूंब पुढे जाते. स्त्री अडाणी असली तर कुटूंबाची उन्नती होत नाही. असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. तसेच स्त्रीयांना उत्तम कपडे, दागिणे यासाठी हट्ट न धरता स्वच्छता, टापटीपपणा असावा. गुणवत्ता व चारित्र्य यावर भर असावा. मुला-मूलींवर चांगले संस्कार असावेत तसेच मुला मूलींमध्ये भेद नसावा असा सल्ला आदेश व उपदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीयांना होता.
● निरक्षरता - भारतीय लोकांचा निरक्षरता हा विकास उन्नतीतील फार मोठा अडथळा आहे. ब्रिटीशांच्या काळात फारच थोडया लोकांनी उच्च शिक्षण घेतले. बहुसंख्य लोक अडाणीच राहिलेत. लोकशाही ही लोकांनीच चालवायची असते. त्यामुळे राज्य कारभाराचे आवश्यक ज्ञान व त्यासाठी शिक्षण असावे लागते. यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
● डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बहुयामी पत्रकारिता - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीची शीर्षके पाहिली की, त्यांच्या सर्वस्पर्शी बुध्दी व वैभवाची प्रचिती येते. भारतातील हिंदू धर्म व या धर्माचे विषमवादी तत्वज्ञान हे त्यांच्या लेखणीचे प्रमुख लक्ष आहे. या धर्मातील जातीयता, विषमता व अस्पृश्यता यासारखे ज्वलंत प्रश्न त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. ते अस्पृश्यतेची कुळकथा विस्तारपूर्वक मांडतात. समाजरचनेच्या विरोधकांची परंपरावादी विचारसरणी स्पष्ट करतात. अस्पृश्य वर्गाला गुलाम करण्याचा, महार वतनाची विगातकता विशद करतात. तसेच समस्त भारतातील स्त्री- शुद्र अतिशुद्र वर्ग व त्यांचे प्रश्नोपप्रश्न त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. या देशातील बहूजन वर्गाच्या शोषणाचे भीषण चित्र ते रेखाटतात. शेतकरी वर्गाची गुलामगिरी व त्यामागील पाश्र्वभूमी ते विश्लेषित करतात. अस्पृश्य वर्गाची कैफियत व्यक्त करतांना ते ज्यांचा त्यांचा महारांवर कटाक्ष कशाप्रकारे असतो हे समप्रमाण स्पष्ट करतात. देशात शुद्र अतिशुद्रांबरोबरच स्त्रियांची भयानक अवस्था याचे प्रत्ययकारी लेखन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. हिंदू समाजातील वर्गा वर्गातील उच्च-नीच भेद व लिंगभेद कायम ठेवून कोणतेही सुधारणूकीचे कायदे करणे म्हणजे घाण न काढता त्यावर उभारलेले पत्यांचे बंगले होय. याचे तपशिलवार विश्लेषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर साकारतात. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनतीस या विषयाचा मागोवा घेतांना ते या अवनतीस जबाबदार असणाज्यांची दाभिकता उलगडून दाखवितात. गिरण्यांचे मालक व कामगार यांच्या संबधाची चर्चा करतांना कामगार वर्गास हितोेपदेश देतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन अस्पृश्य वर्गाची सर्वतोपरी काळजी वाटण्याच्या उद्देशातून आकारास आलेले असल्यामूळे ते हिंदू महासभा व अस्पृश्यता यासारख्या घटकांचा विचार साधारणपणे करतात. या देशातील प्रतिगामी नाझीवादाचे व त्यांच्या प्रतिकूल परिणामांचे ते साक्षेपाने विश्लेषण करतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून भारतीय समाजरचनेची या समाजरचनेतील विविध मतप्रवाहांची त्यातील विचार भिन्नतेची सखोल चर्चा केली आहे. ते अस्पृशांच्या बहुजनांच्या व स्त्री वर्गाच्या गुलामगिरीचा त्यांच्या शोषणाचा सर्वागीण विचार करतात. त्यांचे लेखन शुद्रांच्या अवनतीचे कैफियतीचे रेखाटन करून थांबत नाही. स्त्री शुद्राचे प्रश्न किती गंभीर आहेत हे विशद करून ते त्यावरील उपाययोजना सिध्द् करतांना या युगानुयुगांपासून अनाकलनीय ठरलेल्या प्रश्नांवर ते अचूक उत्तरे शोधून काढतात. या कुट प्रश्नांची ते सर्वांगीण उलक करू पाहतात. व या प्रश्नांचा गुंता सोडविण्यात ते सफलही होतात. भारताचे भवितव्य घडविण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतात. हिंदू धर्म म्हणजे गुलामगिरीचेच दुसरे नाव असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना धर्मत्याग करणे अपरिहार्य वाटत होते. त्यांच्या दृष्टीने धर्मातर म्हणजे मूल्यांतर होते हे धर्मांतर समता तत्वाच्या प्रतिष्ठापणे करीता त्यांना हवे होते. बुध्द् जयंती आणि तिचे राजकिय महत्व यासारख्या लेखांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातील धर्मांतराचे संसूचन प्रगट होते. त्यांच्या लेखाचा प्रवास हा असा अस्पृश्य वर्गाच्या तसेच स्त्री शुद्रादी वर्गाच्या बंधमुक्तीचा प्रवास आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र लेखन हे विचार प्रवर्तक आहे. या लेखातून ते विविध वाद विषयांना व प्रश्न व्यूहांना सामोरे जातात आणि त्या घटकांतील सत्या सत्यास ते वाचकांसमोर मांडतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन समाज परिवर्तनाच्या जाणिवेने मुसमुसलेले आहे. सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयातून हे लेखन आकारास आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेच्या व वैचारिक लेखनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात सर्व प्रथम स्वातंत्र्य सुखाचे प्रभावी प्रगटीकरण केले. त्यामुळेच त्यांची पत्रकारिता युगप्रवर्तक पत्रकारिता ठरते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुर्यकुळाच्या निबंध परंपरेतील अत्यंत जहाल आणि श्रेष्ठतम निबंधकार आहेत. आपले लेखन हे वरिष्ठ वर्गास आत्मपरिक्षण करण्यास प्रवृत्त करण्यासाठी व अस्पृश्य वर्गास आत्मभान आणण्यासाठी आहे. याचे भान त्यांनी कधीही सोडले नाही. त्यामूळे त्यांची लेखन शैली दुर्बोध, बोजड व कृत्रिम न होता ती सुबोध, सुगम अर्थगर्भ व स्वाभाविक स्वरूपाची बनते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनात काही महत्वपूर्ण घटना विचारात घेवून विचार प्रदर्शित केले आहेत व त्या घटनांची माहिती वृत्तपत्रातून प्रसिध्द केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काही लेखन स्वत: केले असले तरी प्रसंगानुरूप त्यांनी आपले नाव तृतीय वचनी लिहिले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेकडे समाजाचे बराच काळ दुर्लक्ष झाले हे खरे आहे. सामाजिक व राजकिय क्षेत्रातील अत्यंत क्रांतीकारी व क्रियाशिल विचारवंत म्हणून त्यांची जी उत्तुंग प्रतिमा लोकांसमोर उभी राहिली, तिच्या छायेत पत्रकार डॉ.बाबासाहेब या प्रतिमेचा काही काळ जणू विलोपच झाला असे म्हणावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा